लोकसत्ता टीम

चंद्रपूर: शहरात आज मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. याच पावसात लालपेठ परिसरातील हनुमान मंदीरावर पहाटे ४. ३० वाजताचे सुमारास वीज कोसळली. या वेळी हनुमान दर्शनासाठी मंदिरात नवरदेव गेला असता थोडक्यात बचावला. वीज मंदिराच्या कळसावर पडल्याने कळसाचा काही भाग तुटला व कळस काळा पडला.

या जिल्ह्यात तथा पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरात सर्वत्र पाऊस कोसळत असताना काही ठिकाणी वीज देखील कोसळली. लालपेठ परिसरात हनुमान मंदिरावर वीज कोसळली. नेमके याच वेळी या प्रभागातील शिरसागर कुटुंबाच्या विवाहाची वरात मंदिरात आली होती.

हेही वाचा… यवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या? चर्चांना उधाण

एक नवरदेव मंदिरात दर्शनाला गेला होता तो बाहेर निघताच वीज पडली, बसच्या काचा फुटल्या नवरदेव यात थोडक्यात बचावला, या नवरदेवाची वरात भंडारा जिल्ह्यात निघाली होती. देव दर्शनानेच नवरदेव बचावला अशी चर्चा आहे. दरम्यान मंदिराच्या कळसावर वीज पडल्याने कळस तुटला आणि काही भाग काळा पडला आहे.