नागपूर: ..ठरलं तर मग, मुहूर्त दुपारी एकचा, सिंहाच्या गृहप्रवेशाचा| lions brought from gujarat will enter the sanjay gandhinational park in mumbai maharashtra | Loksatta

ठरलं! गुजरातच्या सिंहांचा महाराष्ट्रातील ‘या’ प्राणीसंग्रहालयात प्रवेश

गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून काही दिवसांपूर्वी सिंहाची जोडी मुंबईत दाखल झाली. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत.

ठरलं! गुजरातच्या सिंहांचा महाराष्ट्रातील ‘या’ प्राणीसंग्रहालयात प्रवेश
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर: महाराष्ट्र तसा वाघांचा प्रदेश आणि गुजरात सिंहांचा. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या प्रदेशासाठी वाघांना सोबती म्हणून गुजरात सरकारला सिंहांसाठी मागणी घातली. अखेर गुजरात ते. त्यांनी थोडे आढेवेढे घेतले, पण अखेरीस ते मानले आणि मग सुरू झाली गृहप्रवेशासाठी मुहूर्ताची धावपळ.

गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून काही दिवसांपूर्वी सिंहाची जोडी मुंबईत दाखल झाली. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता त्यांना मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा: नागपूर: डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी, आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच….

सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी मंगळवारी सहा डिसेंबरला दुपारी एक वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मुलीचा शिक्षणखर्च परवडेना, तिने दुसऱ्याच्या मुलीचा देह….; नवव्या वर्गातील मुलीच्या विवशतेचा गैरफायदा

ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत. .

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:48 IST
Next Story
चंद्रपूर: न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच तरुणीने घेतला गळफास; आत्महत्या की घातपात?