नागपूर: महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५ जागांचे वाटप निश्चित करण्यात आले. उर्वरित काही जागांसाठी चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. काँग्रेसने काल सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, यात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने (शरद पवार) रविवारी हिंगणा विधानसभा मतदारसंघातून रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शहरात नागपूर पूर्व आणि आता जिल्ह्यातील हिंगणा, काटोल अशा तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. पूर्वी राष्ट्रवादीकडे ग्रमीणच्या दोनच जागा होत्या. पुन्हा एक जागा राष्ट्रवादीने आपल्या पारड्यात पाडून घेतली. हिंगणाममधून राष्ट्रवादीने माजी मंत्री रमेश बंग यांना उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत रमेश बंग?

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये रमेश बंग हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. पंधरा वर्षांपूर्वी भाजपच्या विजय घोडमारे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केलेल्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला होता. आता त्यांचा मुलगा दिनेश बंग हे जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. त्यांनीही हिंगणा विधानसभेतून उमेदवारी मागितली होती. मात्र, रविवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंग यांच्या उमेदवारीची घोषणा केली. रमेश बंग हे दोनदा या मतदारसंघातून विजयी झाले तर दोनदा पराभूत झाले आहेत. यावेळी त्यांची थेट लढत भाजपचे समिर मेघे यांच्याशी होणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – काटोलमध्ये याज्ञवल्क्य जिचकार यांच्या उमेदवारीला कोणाची फूस ? तर्कवितर्क

बंग यांना उमेदवारी का?

मागील महिन्यात शरद पवार नागपूरला येऊन गेले. सार्थक या संस्थेच्या माध्यमातून काही समाजसेवकांचा नागपूरमध्ये सत्कार करण्यात आला. ही संस्था आणि सत्कार समारंभ बंग यांच्याच पुढाकाराने घेण्यात आला. या कार्यक्रमाला रमेश बंग यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांनी पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या परंपरागत हिंगणा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला होता. सार्थक संस्थेच्या सत्कार समारंभाला शरद पवारांना आणून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले, सोबतच उमेदवारीसाठी उड्या मारणाऱ्या इच्छुकांनाही त्यांनी इशारा दिला होता.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसने नाकारले, भाजपने स्वीकारले; आमदार किशोर जोरगेवार यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्ष प्रवेश

असा झाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ

महाविकास आघाडीमध्ये पूर्व नागपूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला देण्यात आली होती. या जागेवर राष्ट्रवादी फारशी इच्छुक नसताना त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. तर हिंगणा विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. त्यामुळे पूर्व नागपूरच्या बदल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हिंगणा कॉंग्रेसला सोडणार होते. पण आतापर्यंत काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही. याचा फायदा घेत राष्ट्रवादीने रमेश बंग यांना हिंगण्यामधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पूर्व नागपूरची जागा पुन्हा काँग्रेसला दिली जाते का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Story img Loader