नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रो स्टेशनपासून गंतव्य स्थानापर्यंत (फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिविटी) प्रवाशांना पोहोचवण्यासाठी शेयर ऑटोरिक्षांची व्यवस्था करण्याबाबत व त्याबाबतीत दर निश्चित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव नुकताच जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या वाहतूक समितीने मंजूर केला असून नवीन वर्षात ही सेवा महामेट्रोतर्फे सुरु केली जाणार आहे. यामुळे मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे आणि मेट्रोने प्रवास केल्यानंतर गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणे अतिशय सुविधाजनक आणि सुखद होणार असून नागपूरकरांसाठी ही नववर्षाची भेटच ठरणार आहे.

नागपूर शहराअंतर्गत प्रवासाच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणणाऱ्या महत्त्वपूर्ण विकासात, महामेट्रो नवीन वर्षात प्रवाशांसाठी शेयर ऑटो सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. ही व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित सर्व प्रमुख शहरांमध्ये ही एकमेव आहे. ही नागपूरकरांसाठी नवीन वर्षाची भेट असेल.

हेही वाचा – धुमकेतू, उल्का वर्षाव, ग्रहण, प्रतियुती, ब्लू मून याची देही याची डोळा पाहता येणार; २०२४ मध्ये खगोलीय घटनांची रेलचेल…

ही संकल्पना केवळ मेट्रोने प्रवास करणे सोपे करणार नाही, तर नागपूरकरांसाठी एक मोठा गेम चेंजर ठरेल कारण ती फीडर सेवा प्रदान करून आवश्यक ठिकाणे जोडेल. सुरुवातीला निवडक स्थानकांवर आणि मुख्य वेळेतील प्रवासासाठी उपलब्ध होईल. या पथदर्शी प्रकल्पाचे परिणाम विचारात घेऊन पुढे इतर स्थानकांवरही ते कार्यान्वित केले जातील.

महामेट्रोतर्फे मंजूर दरांचे फलक मेट्रो स्टेशनवर लावण्याचे काम सुरु असून स्टेशनपर्यंत किंवा स्टेशनपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी एकाच प्रवाशाने ऑटोरिक्षा वापरला तर त्याला पूर्ण भाडे द्यावे लागेल तर दोन किंवा तिघांनी ऑटोरिक्षा शेयर केला तर त्यानुसार प्रत्येकी विभागून भाडे द्यावे लागल्याने ते प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे ठरणार आहे. ऑफिस किंवा व्यवसाय कामासाठी रोजच प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना तर ही सेवा फायद्याची ठरणार आहे. अशा प्रकारची सेवा सुरु करणारी महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लि. ही देशात पहिली संस्था ठरणार आहे.

हेही वाचा – सुनील केदार कारागृहातच राहणार, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करणार – श्रावण हर्डीकर

शेअर ई-रिक्षा सेवा ही लोकमान्य नगर बंसी नगर तसेच चितारओळी, बर्डी या स्टेशनपासून सुरु करून टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. जिथे नागरिकांना जास्त गरज आहे अशी स्थानके प्रथम घेण्यात येतील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात मदत करावी हे माझे आवाहन आहे.