नागपूर : ‘दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर..’, ‘नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री..’, ‘संत्रा आहे गोल, सरकारचा वाजवा ढोल..’ अशा घोषणांनी विरोधकांनी विभान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत  विरोधकांनी आजही आंदोलनाचा तीव्र सूर विधान भवन परिसरात आवळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या विधान भवन परिसरातील आंदोलनाने सुरू झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या..’, शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी, खोके येऊ द्या येऊ द्या, उद्योग जाऊ द्या-जाऊ द्या.. सह संत्री आहेत गोल, भूखंड खाण्यासाठी चढाओढ, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, कापूस- संत्रा- ज्वारी- बाजरी- सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे या अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदि उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session 2022 protestors agitation in vidhan bhavan area against maharashtra ministers mnb 82 zws
First published on: 28-12-2022 at 14:37 IST