scorecardresearch

Premium

नागपूर: ओबीसींच्या मागण्या अखेर मान्य,आंदोलन मागे घेणार…  

मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या  नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर २९ सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

maharashtra government accepts demands of obc finally agitation withdrawn
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आज राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्या.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे  तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या  नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर २९ सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

हेही वाचा >>> अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
Baramati Agro Industrial Project
बारामती ॲग्रो औद्योगिक प्रकल्प बंद करण्याचे प्रकरण : रोहित पवार यांना मिळालेला अंतरिम दिलासा १३ ऑक्टबरपर्यंत कायम
monsoon session of maharashtra assembly to begin from today
सत्तासंघर्षांच्या नव्या वळणार विधिमंडळाला पूर्णवेळ सचिव नाही!
narendra modi and President of Brazil Luiz Inacio Lula da Silva
G20 Summit 2023: सुरक्षा परिषदेचा विस्तार करा!; पंतप्रधान मोदी यांची आग्रही मागणी, ‘जी-२०’शिखर परिषदेचा समारोप

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आज राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्या.  त्यामुळे नागपुरात सुरू असलेले साखळी उपोषण उद्या, दुपारी ४ वाजता मागे घेण्यात येणार आहे. आंदोलन स्थगित करीत असल्याची अधिकृत घोषणा उद्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात जाहीर करण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra government accepts demands of obc finally agitation withdrawn rbt 74 zws

First published on: 29-09-2023 at 19:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×