लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून सर्वच राजकीय पक्ष या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करीत आहे. याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर न देता केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, जातीनिहाय जनगणना हा देशातला सर्वात मोठा मुद्दा आहे.

आणखी वाचा- संतनगरी शेगावात अवतरली पंढरी! ‘श्रीं’च्या पालखीची मंदिर परिक्रमा; कार्तिकीनिमित्त लाखावर भाविकांनी घेतले दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जातीनिहाय जनगणना झाल्यास देशातला निधी कोणत्या आधारावर वितरित केला जातोय, तेदेखील या माध्यमातून सर्वांच्या समोर येईल. हीच राहुल गांधीसह काँग्रेसची भूमिका आहे. भाजप नेते काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप करीत आहेत. पण, तुष्टीकरणाचे राजकारण भाजपच करीत आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष असल्याने ‘भारत जोडो’ यात्रा करीत आहे. प्रचारादरम्यान अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यावर ते म्हणाले, निवडणूक आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर त्याला काय उत्तर द्यायचे ते ठरवू.