चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहरातील यशोदा नगर भागात राहणारे शिवशंकर यादव हे चिमणी प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासह स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी त्यांनी स्वतःच्या घरात तब्बल २२५ लाकडी घरटी तयार करून चिमण्यांना आश्रय दिला आहे.

ते स्वतः एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सध्या कंपनी बंद पडल्याने निम्म्या पगारावर त्यांचा कुटुंब गुजराण करीत आहे. मात्र, तरीही चिमणी वाचवण्यासाठीचा त्यांचा संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे.

हेही वाचा >>> उपराजधानीत पब, क्लब, हुक्का, बार आता रात्री दीडपर्यंत; २५ वर्षांखालील युवकांना मद्यबंदी

वाढते शहरीकरण, प्रदुषण, जंगलाची कमतरता यामुळे पक्षी नाहिसे होत आहे. शहरात पक्षी व पक्ष्यांचा किलबिलाट नाहीसा झाला आहे. त्यामुळे वरोरा शहरातील शिवशंकर यादव हे चिमणी वाचावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी त्यांनी चक्क आपल्या घरामध्ये तब्बल २२५ लाकडी घरटी तयार केली आहे. जंगलातील विशिष्ट काडीकचरा आणि कापसापासून शिवशंकर यादव यांनी चिमण्यासाठी घरटे तयार केले आहे. एका घरट्यासाठी ४०० रूपये खर्च त्यांना आला आहे. पावसाळ्यात या चिमण्यांना तीन किलोहुन अधिक तांदूळ, पाणी व ब्रेड देखील द्यावे लागते. पावसाळ्यात हे खाद्य तब्बल १२ किलोपर्यंत वाढवावे लागते. हे सर्व काम ते आपल्या कुटुंबाच्या मदतीने करीत असतात.

हेही वाचा >>> VIDEO: गांधी की सावरकर? भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कुणाचं योगदान जास्त? भाजपा खासदार त्रिवेदी म्हणाले…

यादव यांच्या घरी मोठ्या संख्येने चिमण्या वास्तव्याला असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घरी चिमण्या ठेवण्यास विरोध केला आहे. विरोध होत असतांना विरोधाकडे दुलर्क्ष करून शिवशंकर यादव चिमण्यासाठी स्व:तच्या घरी घरटे उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांचा पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमींनी स्वागत केले आहे. मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम आणि आत्मिक समाधानासाठी स्वखर्चातून बांधलेली घरटी आकर्षण केंद्र ठरीत आहेत. पुढील काळात आणखी शंभर घरटी तयार करणार असल्याचे पक्षीप्रेमी शिवशंकर यादव यांनी सांगितले.

संगोपनासाठी ५ लाख खर्च करण्याची तयारी

जंगलांची बेसुमार कत्तल व जुने वाडे- घरे मोडकळीस येवून त्याठिकाणी सिमेंटच्या घरे झाल्याने चिमणी दिसेनाशी झाली आहे. अशा स्थितीत शिवशंकर यादव यांनी चिमणी जगावी यासाठी अनोखे प्रयोग राबवित आपल्या सेवानिवृत्तीनंतर सुमारे पाच लाख रुपये चिमण्यांच्या संगोपनासाठी खर्च करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरात २२५ लाकडी घरटे चिमण्यांचे संगोपन, पिलांची आणि जखमी चिमण्यांची सुश्रुषा त्यांचा सांभाळ करतात. त्यांच्यासाठी दाणा-पाणी उपलब्ध करून देतात. या चिमण्यासाठी २२५ लाकडी घरटे तयार करण्यात आले आहे. एखादी चिमणी जखमी झाल्यास डॉक्टरच्या मदतीने तिचावर उपचार देखील केला जातो.