पुसद तालुक्यातील धनसळ येथील थरार

दहा हजार रुपये उसने दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राचा चाकूने वार करून खून केला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील धनसळ येथे घडली. या घटनेत मध्यस्थी करणाऱ्या मित्रावरही आरोपीने चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. सुरेशचंद्र मल्हारी कवडे (३७) असे मृताचे तर  प्रवीण सात्विक थिटे (३२) दोघेही रा.धनसळ असे जखमीचे नाव आहे.  खंडू लक्ष्मण गुळवे (४०, रा.धनसळ असे  आरोपीचे नाव आहे. सुरेशचंद्र, प्रवीण व खंडू हे तिघेही मित्र आहेत.

हेही वाचा >>> वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग; म्हणाली, “ऑफिसमध्ये एकटक बघायचा, अन् मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत सुरेशचंद्र हा धनसळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिपाई होता. उदरनिर्वाहासाठी तो घरी किराणा दुकान देखील चालवत होता. तिघेही सोबत राहायचे. सुरेशचंद्रला खंडूने दहा हजार रुपये उसने मागितले होते.  सुरेशचंद्रने सध्या पैसे नाहीत नंतर देतो असे सांगूनही खंडूने वाद निर्माण केला होता. आज शुक्रवारी सुरेशचंद्र हा ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी आला असता  खंडूने  मागून येऊन त्याचा गळा कापला. मध्यस्थी करणाऱ्या प्रवीणच्या डोक्यावरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दोन्ही जखमींना पुसदला भरती केली असता उपचारादरम्यान सुरेशचंद्रचा मृत्यू झाला. घटनेनंतर खंडू पसार झाला. मृताची पत्नी शिल्पा कवडे हिने पुसद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.