नागपूर : सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .विरोधी पक्षाचे नेते संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.सरकारक़डे नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा नोंदी सापडल्या आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. अधिसूचना जाहीर होऊ द्या, काही आक्षेप असेल तर त्यावर सुनावणी होईल. मराठा समाजाला मागील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आरक्षण मिळाले होते मात्र उद्धव ठाकरे सरकारने टिकवले नाही. तेच आरक्षण परत देण्याची भूमिका सरकारची आहे. 

हेही वाचा >>> देशात समता व विज्ञानाच्या मूल्यांची अधोगती; प्रा.श्याम मानव म्हणाले, ‘असेच सुरू राहिले तर आपण स्वातंत्र्य गमावू’

सरकारच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करु. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ. यावर आक्षेप सुद्धा मागवले आहेत. त्याची सुनावणी होईल. त्यानंतर अधिसूचना मान्य होईल,असे बावनकुळे म्हणाले.  जे मुळात कुणबी समाजात होते त्या लोकांनाआता  लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>> आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय बोलले माहित नाही. ओबीसीवर अन्याय होणार नाही. ही भूमिका सर्वच पक्षाची आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री यांनी हे मान्य केले होते.  सरकारच्या निर्णयावरुन ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ओबीसीत कोणालाही वाटेअरी करून घेतले गेले नाही. पुढे काय भूमिका येईल ते बघू. आज तरी ओबीसी समाजात अन्याय झाल्याची चिंता करण्याची गरज नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सदावर्ते यांच्यासोबत भाजपचा कुठलाही संबंध नाही, असे सांगताना बावनकुळे यांनी मनसेने भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर दिले.एखाद्या वेळी भूमिका विरुद्ध गेल्यावर भाजपला बदनाम करण्याचे काम काही जण करतात,असे ते म्हणाले