लोकसत्ता टीम

नागपूर : मतीमंद मुलीवर वस्तीत राहणाऱ्या एका युवकाने लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती तब्बल चार महिन्यांची गर्भवती झाली. आईच्या प्रकार लक्षात आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आरोपी युवकाला अटक केली. सदरे नसरुद्दीन आलम असे आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मजूर दाम्पत्य राहते. त्यांना १६ वर्षांची मतीमंद मुलगी आहे. तिला व्यवस्थित बोलता येत नाही. हातवारे करीत ती संभाषण साधते. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटाचा आकार वाढत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यातच ती पोट दुखत असल्याचा इशारासुद्धा करीत होती. त्यामुळे तिच्या आईने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तेथून तिने पतीला माहिती दिली आणि थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचली. ठाणेदार प्रवीण काळे यांची भेट घेतली. एमआयडीसी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र, तिच्याकडे चौकशी केली असता आरोपीबाबत काहीही धागा गवसत नव्हता. त्यामुळे पोलीस हतबल झाले.

आणखी वाचा-बुलढाण्यातील भाजप बंडखोर विजयराज शिंदेंना नागपुरात पाचारण; प्रदेशाध्यक्षांशी करणार चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी आली घटना उघडकीस

आरोपींबाबत सुगावा लागत नसल्यामुळेपीडित मतीमंद मुलीची चौकशी करण्यासाठी भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे आणि समूपदेशक प्रेमलता पाटील या रुग्णालयात गेल्या. त्यांनी मुलीचे समूपदेशन करीत तिला विश्वासात घेतले. संशयित आरोपींबाबत आस्थेने विचारपूस केली. मुलीचे हातवारे आणि सांकेतिक भाषावरून आरोपी सदरे याचा शोध लागला. त्यामुळे लगेच आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.