राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांत प्रचंड गोंधळ करणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’ची अखेर विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’ला झुकते माप देणाऱ्या कुलगुरूसह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही समिती आठ दिवसांत आपला अहवाल सादर करणार असून समितीसमोर सर्वच तक्रारींवर चर्चा होणार आहे. ‘लोकसता’ने हा विषय लावून धरला, हे उल्लेखनीय.

चंद्रपूर : ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरेंच्या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

सहा वर्षांअगोदर नागपूर विद्याापीठाशी झालेल्या करारातील अटींचे पालन न करता परीक्षांचे काम ‘एमकेसीएल’ला पुन्हा देणे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना महागात पडले आहे. ‘एमकेसीएल’मुळे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे निकाल सहा महिन्यांपासून रखडले होते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला आला. यावर उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी रविवारी विद्यापीठामध्ये निकाल आणि ‘एमकेसीएल’ या प्रकरणावर बैठक घेतली. यावेळी विद्यापीठातून ‘एमकेसीएल’चे काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ‘प्रोमार्क’ कंपनीला पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

नागपूर : राजकीय टीका केल्यास कलावंत, वाहिनी सगळेच अडचणीत – समीर चौघुलेंची वास्तवदर्शी प्रतिक्रिया

भविष्यात विद्यापीठाचे काम हे केंद्र सरकारच्या ‘समर्थ’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालवले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. बैठकीला आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. प्रवीण दटके, विष्णू चांगदे, शिवाणी दाणी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. चौधरींच्या अडचणी वाढणार –

ना. पाटील यांच्या बैठकीमध्ये परीक्षा विभागच ‘एमकेसीएल’ला काम देण्यापासून अनभिज्ञ असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे कुलगुरूंनी परस्पर ‘एमकेसीएल’ला काम दिले का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. ना. पाटील यांनी दोषींवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे ‘एमकेसीएल’ प्रकरणात कुलगुरू डॉ. चौधरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘एमकेसीएल’कडून प्रतिसाद नाही –

यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमकेसीएल’चे अधिकारी देशपांडे यांना अनेकदा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्यालयाला संपर्क केला असता येथील महाव्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister of higher and technical education expelled mkcl from nagpur university a meeting will be held with the vice chancellor and officers msr
First published on: 29-08-2022 at 10:44 IST