चंद्रपूर:राज्याचे सांस्कृतिक, वन व मस्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रविवार १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती साजरी करताना बाल गोपालांसोबत ढोल ताशा वाजवीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवार १९ फेब्रुवारीला शिव जयंती उत्सवाचे आयोजन सकाळी १० च्या सुमारास  पटेल हायस्कुल समोरील शिव स्मारक येथे करण्यात आले होते.

हेही वाचा >>> महाराष्ट्राच्या राज्यगीताचा चंद्रपूर नगरीतून शुभारंभ; ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाला महिलांसह बाल गोपाल विविध वेषभूषेत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होते.  यावेळी सांस्कृतिक कार्य,वने व मत्स्यपालन व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बाल गोपालासोबत सहभागी झाले. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बाल गोपाल यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करील ढोल वाजविला. स्वतः पालकमंत्री ढोल वाजवीत असल्याचे बघून बालक देखील त्यांच्या सोबत वाद्य वाजवायला लागले.