नागपूर : मंत्रीपद मिळेल म्हणून एक वर्षापासून वाट बघणाऱ्या शिंदे गटांतील आमदारांचा संयम आता सुटायला लागला आहे. “आम्हाला केवळ ‘तारीख पे तारीख ‘देऊन बोळवण केली जाते आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा शपथविधी झटपट ऊरकला जातो”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार व्यक्त करू लागले आहेत.

हेही वाचा – नागपूर : ‘व्हिडीओ लाईक्स’च्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मविआ सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध निधी वाटपाच्या संदर्भात जाहीर ओरड करणारे पहिले आमदार जयस्वाल होते. शिंदे यांना पाठिंबा द्या, असे फडणवीस यांनी सांगितल्यावर त्याचे पालन जयस्वाल यांनी केले. त्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. एक वर्षापासून ते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होतो. विस्तार झाला पण राष्ट्रवादीसाठी. त्यामुळे शिंदे समर्थक अस्वस्थ झालेत. आता पुन्हा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असे सांगितले जाते आहे. यावर प्रतिक्रिया देताना जयस्वाल म्हणाले, ”आम्हाला केवळ तारीख पे तारीख दिली जात आहे.”