नागपूर: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सत्ताधारी पक्षातील आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून २५ जुलैला मुंबईत आंदोलन होणार आहे. त्यासाठी कामगारांच्या व्हाॅट्सएप ग्रुपवर चलो मुंबईचे संदेश धडकत आहे.

एसटी कामगारांच्या व्हाॅट्सएपवर फिरणाऱ्या संदेशात सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली होती. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु प्रशासन हे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत २५ जुलैच्या मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली गेली.

हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय महामंडळ असलेल्या एसटी प्रशासनाला एसटीतील खात्यांतर्गत परीक्षेसाठी २४० दिवसाची अट रद्द करावी. अट रद्द होत नाही तोपर्यंत परीक्षा रद्द कराव्या. याबाबतचे जाचक परिपत्रक आणि एफएनसी बदल्या बाबत चर्चा करून शिस्त आवेदन पद्धतीत शिथिलता आणावी. भाडेतत्वावर येणाऱ्या बसेससाठी सेवापूर्व प्रशिक्षित एसटी महामंडळातील चालकाचा वापर करावा या मागण्या करण्यात आल्या आहे. एसटीत भाडेतत्वावर ५ हजार चालक आले तर आपल्या चालकांचे काय? हा प्रश्न उपस्थित करत संघनेने कर्मचाऱ्यांना मुंबईत २५ जुलैला पोहचून आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाचा इशारा दिल्याचे सदाभाऊ खोत यांनी मान्य करत सध्या प्रशासनाने चर्चेसाठी बोलावल्याचे सांगितले. त्यात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन होणार असल्याचाही दावा केला.