नागपूर : मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मुंबईत (मीरा-भाईंदर) मोर्चा काढला. तत्पूर्वी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात मनसैनिकांची धरपकड सुरू केली. त्यानंतर दुपारी मोर्चाला परवानगी देण्यात आली. राज्य सरकारमधील मंत्री देखील आंदोलनस्थळी दाखल झाले. हे एकीकडे सुरू असताना नागपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मराठीच्या मुद्यांवर आक्रमक झाले आहे.

अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी मीरा-भाईंदर शहरात मोर्चा नियोजित होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून, प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत, पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले. सकाळी साडेतीन वाजता, मोठ्या पोलीस फौजफाट्यासह त्यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. परंतु, अविनाश जाधव मोर्चात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले होते. सध्या अविनाश जाधव यांना काश्मिरी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या आंदोलनाला मराठी मासणाचा पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने मवाळ भूमिका घेत मार्चाला परवानगी दिली. तर राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांनी केलेल्या धरपकडीचा निषेध केला.

मीरा रोड येथे होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे आदी ठिकाणीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ठेवण्यात आले होते. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहराध्यक्ष संजय मेहरा, नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी दिघोरी येथे महापालिकेच्या निर्माणाधीन इमारतीवर मराठी ऐवजी इंग्रजीतून लिहलेल्या फलकाविषयी नाराजी व्यक्त केली. मंडपे यांनी महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सार्वजनिक स्वच्छता गृहावर मराठी भाषेचे फलक लावण्याची मागणी केली. अन्यथा या इमारतीचे लोकार्पण करू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.