नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राज्य सरकारकडून विविध पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मागणीपत्र आल्यानंतरही अनेक पदांसाठी अद्यापही जाहिरात न आल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे. राज्य सरकारकडून एप्रिल महिन्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी मागणीपत्र देण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही सहाय्यक प्राध्यापक भरतीची जाहिरात आलेली नाही.

हेही वाचा – अमरावतीतील दोन तालुक्‍यांमध्‍ये अतिवृष्‍टी, पाच मंडळांमध्‍ये शंभर मिलिमीटरपेक्षा जास्‍त पाऊस; पूर्णेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनानंतर राज्य शासनाने विविध पदांची भरती सुरू केली आहे. एमपीएससीच्या कक्षेतील विविध पदांसाठी जाहिरात दिली जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांसाठी सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार आहे. तसे ९४ पदांचे मागणीपत्रही देण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही अद्याप जाहिरात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. सहाय्यक प्राध्यापकपदासाठी आवश्यक असणारी नेट, सेट परीक्षेची पात्रता अनेक उमेदवारांकडे आहे. मात्र जाहिरात येत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.