scorecardresearch

Premium

सराफा व्‍यावसायिकाच्‍या हत्‍येचे गूढ उकलले, गवंडीकाम करणारा निघाला मारेकरी

तिवसा येथील सराफा व्‍यावसायिकाच्‍या हत्‍येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

mystery of the murder of the jeweller was solved
आरोपीने लाकडी दांड्याने मांडळे यांच्या डोक्यावर प्रहार करुन त्यांची हत्‍या केली. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्‍ता टीम

अमरावती : तिवसा येथील सराफा व्‍यावसायिकाच्‍या हत्‍येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गवंडीकाम करणाऱ्या आरोपीने सराफा व्‍यावसायिकाच्‍या डोक्यावर कुदळीच्‍या दांड्याने प्रहार करून त्‍यांची हत्‍या केल्‍याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीकडून सोने, चांदीच्‍या दागिन्‍यांसह ७.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकारांना दिली.

Nashik Police, visit hospitals, regular patrolling, Fatal Attack, doctor, kailash rathi, panchavati,
नाशिक : आता नियमित गस्तीत पोलिसांची रुग्णालयांनाही भेट; डॉ. कैलास राठींवरील हल्ला, वैद्यकीय व्यावसायिकांना हादरा
case has been registered against the workers who obstructed the work of the cell company
पनवेल : सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल
Creative Academy residential school in Rawet without license inquiry committee from Municipal Corporation
पिंपरी : रावेतमधील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळा विनापरवाना, महापालिकेडून चौकशी समिती
Three accused of defrauding a businessman in Borivali of 10 crores arrested Mumbai news
बोरिवलीमधील व्यवसायिकाची १० कोटींची फसवणूक; तीन आरोपी अटकेत

सराफा व्‍यावसायिक संजय मांडळे ( ५५, रा. त्रिमूर्ती नगर, तिवसा) यांचे बाजारओळीत दुकान आहे. मांडळे यांचा मृतदेह सोमवार २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्याच घरात आढळून आला होता. या प्रकरणात आरोपी रोशन दिगांबर तांबटकर (२५, रा. देऊरवाडा, ता. आर्वी, जि. वर्धा) याला अटक करण्यात आली असून, त्याने हत्‍या व चोरीची कबुली दिली आहे.

आणखी वाचा-वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी सापडला साताऱ्यात

काही दिवसांपूर्वी मांडळे यांचा अपघात झाला होता त्यात त्यांना दुखापत झाल्याने त्यांनी सराफा दुकानात जाणे बंद केले होते. ते घरीच राहत होते आरोपी रोशन तांबटकर हा तीन चार महिन्यांपासून मांडळे यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम करीत होता. त्यामुळे मृताच्या मुलासोबत त्याची मैत्री देखील झाली. त्यातून सोमवारी मांडळे हे घरी एकटेच असतात. मुलगा आईला घेऊन अमरावतीला दवाखान्यात जात असतो, अशी माहिती आरोपी रोशनने मिळविली. सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सात वाजताच्या सुमारास मांडळे एकटेच घरी होते. त्यावेळी रोशन दारू प्राशन करून मांडळे यांच्या घरी गेला. त्याने मजुरीपेक्षा अधिक पैशाची मागणी केली. त्यावर मांडळे यांनी नकार दिल्याने तो वरच्या मजल्यावरून खाली आला. कुदळीचा दांडा घेऊन तो पुन्हा वर गेला. त्याने मांडळे यांनी सोप सुपारी मागितली. ती देऊन पानपुडा ठेवण्याकरीता मांडळे वळले असता त्याने लाकडी दांड्याने मांडळे यांच्या डोक्यावर प्रहार करुन त्यांची हत्‍या केली. त्यानंतर त्याने घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

आणखी वाचा-पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने १.७३ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

घरातून सुमारे ७४.६८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार मृताच्या मुलीने तिवसा पोलिसांत नोंदविली होती. मात्र आरोपीकडून १२ हजार रोख रकमेसह ७.३७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामुळे तक्रारीत कुठल्या आधारावर ऐवज नमूद करण्यात आला, याची माहिती घेण्यात येणार आहे. पोलीस कोठडीतील चौकशीतून अधिक माहिती समोर येऊ शकेल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांनी संशयित म्हणून रोशनची उलटतपासणी घेतली. त्यातच त्याने टोलवाटोलवीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तब्बल ६० संशयितांची तपासणी केली. आरोपी रोशनला २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच ताब्यात घेण्यात आले. एलसीबीसह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे व तिवसाचे ठाणेदार प्रदीपसिंग ठाकूर यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद म्‍हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mystery of the murder of the jeweller was solved mma 73 mrj

First published on: 30-11-2023 at 11:03 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×