राज्यात शिवसेना आणि भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे प्रथमच संघभूमी नागपुरात येत आहेत. ते येथील शिवसैनिकांना काय संदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – भारत विकास परिषदेच्या संमेलनाला राज्यपाल, सरसंघचालक येणार

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. या सत्तांतराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे चित्र भाजपकडून निर्माण केले जात आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता ठाकरे यांचा नागपूर दौरा महत्त्वपूर्ण ठरतो. शिवसेनेतर्फे २७ ऑगस्टला तान्हा पोळानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ठाकरे सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – काँग्रेस नेत्यांविरुद्धची भाजप आमदाराची याचिका फेटाळली 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक कापसे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख ्प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया उपस्थिती राहणार आहेत.शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल शिंदे यांच्यासह काही आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. रामटेकचेच अपक्ष आमदार व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आशीष जयस्वाल हे सुरूवातीपासूनच शिंदेसोबत आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना मानसिक बळ देण्यासोबतच पक्षात नव्याने प्राण फुंकण्यासाठी ठाकरे काय संदेश देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.