नागपूर : काँग्रेसने मतचोरीचा आरोप भाजपवर करताना त्यांची सुरुवात कामठी विधानसभा मतदार संघातून चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचा आरोप कामठीत झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात केला होता. काँग्रेसने कामठीत ज्या भागातून पदयात्रा काढली, त्या भागात विधानसभा निवडणुकीत सर्वांधिक मतदान काँग्रेसलाच झाले आहे यावरून मतचोरी कोणी केली हे स्पष्ट होते, अशा शब्दांत पालकमंत्री बावनकुळे यांनी काँग्रेसला प्रतिउत्तर दिले. ते शुक्रवारी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
काँग्रेसने कामठी येथे ‘वोट चोर गद्दी छोड’ राज्यस्तरीय निधेष मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. या मेळाव्यात बावनकुळे यांच्यावर काँग्रेसने मतचोरी’च्या मुद्यावर हल्लाबोल केला. मतचोरीचा मॉडेल सर्वप्रथ कामठीत राबवण्यात आले,. त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला, असा आरोप करण्यात आला होता. त्याला प्रतिउत्तर देताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसची पदयात्रा कामठीत ज्या भागातून काढली. त्या भागातील बूथवर काँग्रेसला सर्वांधिक मते मिळाली, त्यावर कोणी मतचोरी केली हे स्पष्ट झाले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाही. काही जण सामाजिक सलोखा बिघडवत असून संभ्रम निर्माण करीत आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. पुरावे नसल्यास प्रमाणपत्र मिळणार नाही. फक्त नोदणी शोधली म्हणून त्यावर प्रमाणपत्र देणार नाही, अधिकारी हे नियमाप्रमाणेच सही करतील, कुठलेही कास्ट सर्टिफिकेट चॅलेंज होऊ शकतो. त्यामुळे ओबीसींनी संभ्रमित होऊ नये, असे बावनकुळे म्हणाले.
छगन भुजबळ नाराज नाही. त्यांचा काही आक्षेप असेल तर तो दूर करू, कुठल्या वाक्याबद्दल संभ्रम असेल तर त्यावर चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या उपसमितीत कुणबी मंत्री नाही याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ही कॅबिनेटची समिती आहे. यात तिन्ही पक्षाचे मंत्रीआहे. कॅबिनेट मंत्री असा शब्द असल्याने तेच या समितीत राहील, विदर्भात कुठल्याही समाजाचा असला तरी सर्व एका दिलाने काम करतात.
महिला पोलीस अधिकाऱ्याला उपमुखमंत्री अजित पवार यांनी फोनवरून धमकावल्याच्या प्रकरणात बावनकुळे म्हणाले,अजित पवार यांचा हेतू स्वच्छ होता ते चुकीच्या कामासाठी फोन करत नाही, दैनिक सामना मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले, याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, सामनाला फडणवीस यांचे कौतुक करण्यासाठी वेळ लागतो, सामानाचे आभार मानतो, मराठा समाजाला न्याय देणे, कोर्टात टिकवणे, सारथीमधून लाभ देणे, इडब्लएसचे १० टक्के आरक्षण देणे यासाठाी फडणवीस अभिनंदनास पात्र आहे. विकसित महाराष्ट्र म्हणून काम करत आहे. विकसित भारताचा संकल्प घेतला आहे, सामनाकडून हीच अपेक्षा आहे. त्यांनी नेहमी कौतुक कारावे.
जिल्हा परिषद रोस्टर याचिका
याचिका दाखल करणे हा याचिकाकर्त्याचा अधिकार आहे… राज्य शासन कुठलाही अधिनियम कधीही वापरू शकते, पाच रोस्टर झाले. पण ६ वे रोस्टरसाठी लोक मिळत नाही, विधी विभागाचे मत घेऊनच रोस्टरचा निर्णय घेतला, याचिका करते गेले असल्यास आम्ही बाजू मांडू, असे बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांना ८ हजार हेक्टर जमीन परत
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८ हजार हेक्टर जमीन परत मिळवून देण्याच्या निर्णयाचा त्यांनी विशेषउल्लेख केला. फडणवीस सरकारमुळे शेतकरी पुन्हा जमिनीचे मालक झाले, हा अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.