नागपूर : भारतात यंदा ७१ व्या ‘मिस वर्ल्ड स्पर्धे’चे आयोजन केले जात आहे. मुंबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत नागपूरकर डिझायनरचा पोशाख झळकणार आहे. शहरातील फॅशन डिझायनर प्रेरणा गुप्ता यांनी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी विशेष पोशाखाची निर्मिती केली आहे.

मिस वर्ल्ड स्पर्धकांपैकी एक असलेली मिस मोरोक्को सोनिया मन्सूर नागपूरमधील डिझायनर प्रेरणा गुप्ता यांनी तयार केलेला पोशाख परिधान करणार आहे. ‘लॉंग ट्रेल गाऊन’ प्रकारातील हा परिधान आहे. मागील आठ वर्षांपासून नागपूरमध्ये फॅशन डिझायनींग क्षेत्रात प्रेरणा गुप्ता कार्य करत आहे. मिस मोरोक्कोचा खिताब प्राप्त सोनिया मन्सूर यांच्याशी सखोल संवाद साधून पोशाष तयार केला असल्याची माहिती प्रेरणा गुप्ता यांनी दिली. ‘जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस मोरोक्कोच्या माध्यमातून नागपूरच्या डिझायनरचा पोशाख प्रदर्शित केला जाईल, याचा मला आनंद आहे. ही खूप छान आणि अभिमानाची भावना आहे. आपल्या देशातील तरुण डिझायनर्सला यामुळे प्रेरणा मिळेल’, असेही प्रेरणा गुप्ता म्हणाल्या.

हेही वाचा – खासदार प्रफुल पटेल म्हणतात, “भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवर दावेदारी सोडली नाही”

हेही वाचा – ‘बर्ड फ्लू’ग्रस्त कोंबड्यांच्या सतत संपर्कात, अखेर कर्मचाऱ्यांचीच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेरणा गुप्ता यांनी मिस मोरोक्को सोनिया मन्सूर यांच्यासाठी पेस्टल रंगाचा क्वीन गाऊन तयार केला आहे. यामध्ये चांदीच्या रंगाचे मोती आहेत तसेच फुलांचे नक्षीकाम देखील आहे. राणीच्या मुकुटाने हा गाऊन प्रेरित असल्याची माहिती प्रेरणा गुप्ता यांनी दिली.