नागपूर : हिट ॲण्ड रन संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी नागपूरसह देशभर विविध ठिकाणी ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये वाहनांच्या दोन कि.मी. रांगा, प्रवाशांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन कायद्यानुसार ट्रकने अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याचा विरोध करण्यासाठी ट्रक व टँकर चालकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. नागपूरमध्ये दोन महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली, एस.टी.बसेस अनेक तास अडून पडल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. उपमुख्यमंत्री सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी नागपुरात आले होते. बैठक आटोपल्यावर त्यांना ट्रक चालकांच्या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले “मी याबाबत माहिती घेतो आणि नंतर बोलतो.” त्यांनी या विषयी अधिक बोलणे टाळले.