नागपूर : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पाल्याला नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या आणखी एका पालकाला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जावेद मोहम्मद युनूस शेख (रा. देशपांडे लेआऊट, नंदनवन) असे अटकेतील पालकाचे नाव आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३ पालकांना अटक केली असून अन्य १४ आरोपी पालकांचा शोध पोलीस घेत आहे.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासह आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना खासगी शाळेतील शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने ‘आरटीई’ अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी २५ टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, या राखीव जागेतून श्रीमंत पालकांच्या मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘आरटीई’ घोटाळ्याचा सूत्रधार शाहिद शरीफने राज्यभर टोळी तयार केली. त्याने हजारो श्रीमंत पालकांच्या मुलांना अपात्र असतानाही नामांकीत शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला.

हेही वाचा – वर्धा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे अमर काळे ८० हजारांहून अधिक मतांनी विजयी, भारत जोडो अभियानाचे ध्येय सफल

हेही वाचा – विदर्भात काँग्रेसची मुसंडी, भाजपला फटका; मविआ’ला १० पैकी ७ जागांवर यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद जावेश शेख याचा ऑटो डीलचा व्यवसाय आहे. महिन्याकाठी जवळपास ४ ते ५ लाखांपेक्षा जास्त कमाई आहे. मात्र, मो. जावेद शेख याला स्वतःच्या मुलाला भवन्स शाळेत प्रवेश मिळवायचा होता. त्यासाठी त्याने शाहिद शरीफ याच्या टोळीतील एकाला हाताशी धरुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र बनावट तयार केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे मो. जावेद याने मुलाला प्रवेश मिळवला. आरटीई घोटाळा उघडकीस येताच सीताबर्डी पोलीस ठाण्यात १७ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यापैकी श्यामसुंदर पांडे आणि तारेंद्र पवार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. मात्र, फरार असलेला मो. जावेद शेख यालाही सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.