नागपूर : एक ऐतहासिक पाऊल टाकत १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासन एक वर्षापर्यंत किंवा २०० यात्रा यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे.

हा पास केवळ गैर व्यावसायिक खासगी वाहने (कार-जीप-व्हॅन आदी) यासाठी विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर तो चालणार आहे. वाषिक पाससाठी लवकरच महामार्ग ॲप आणि एनएचआच्या संकेतस्थळावर एक स्वतत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे.

पास उपलब्ध करून देण्याचे धोरण ६० किलोमीटर परिसरात असलेल्या टोल नाक्यांपासून तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कस्सर्न्सला अधोरेखीत करेल तसेच टोल नाक्यावर कर देण्याची प्रक्रियाही सुलभ होईल. टोल नाक्यावर होणारा विलंब कमी होईल. नाक्यावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होईल तसेच विविध कारणांमुळे नाक्यांवर होणारे वादही कमी होतील, असा विश्वास नितीन गडकरींकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोलपासमुळे वाहन धारकांची वर्षाल १० हजाराची बचत – गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यासाठी वार्षिक पासची योजना घोषित केली. या योजनेमुळे वाहन धारकांची वर्षाला १० हजार रुपयांची बचत होईल, असा दावा गडकरी यांनी केला. गडकरी यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार वाहन मालकाला तीन हजार रुपयात पास खरेदी करावी लागेल. त्याची वैधता एक वर्षाची असेल. ती फक्त राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरच वैध असेल. राज्य शासनाच्या किंवा इतर सरकारी प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर ती चालणार नाही. या पासवर एका वर्षात २०० फे-या मारता येईल. सध्या प्रत्येक टोल वर ५० ते ८० रुपयांपासून पुढे टोल आकारला जातो. या पासमुळे तो केवळ १५ रुपये लागेल. यामुळे वाहन धारकांची पैसे तर वाचेलच वेळेची बचत ही होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.