नागपूर : लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीला मतदान होईलच, हे सांगता येणार नाही. ही योजना राज्यात जास्त काळ चालणार नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी प्रथमच या योजनेवर भाष्य केले.

नागपुरातील रविभवन येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे. महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली. या योजनेचे पहिले दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमासुद्धा झाले. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेसंदर्भात राज ठाकरे म्हणाले, योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. लवकरच दुसरा हप्ताही मिळेल. परंतु त्यानंतर सरकारकडे पैसा कुठे आहे.

हेही वाचा…“विरोधक महिला असुरक्षित असल्याचा ‘ नॅरेटिव्ह’ पसरवत आहे,” उदय सामंत यांचा आरोप

राज्यातील नागरिकांना असे फुकटाचे पैसे नको आहेत. नागरिकांची मागणी समजून घ्यायला हवी. त्यांना काम हवे आहे. त्यामुळे सरकारने त्यांना काम द्यायला हवे. शेतकऱ्यांना मोफत वीज नको. त्यांना शेतमालास भाव हवा आहे. राज्यातील करदत्यांचा हा पैसा आहे. यामुळे लोकांना फुकट काही देण्याऐवजी रोजगार द्यावा, असे रोखठोक भाष्य राज ठाकरे यांनी केले.

मध्य प्रदेशात यश मिळाले ते केवळ लाडकी बहिणीमुळे मिळाले, असे नाही. त्याला इतरही कारणे असतील. अजित पवार यांनी सांगितले आहे की, निवडून दिले तरच पुढे योजनेचे पैसे मिळतील. राज्यातील लोक काम मागत आहे. ते फुकटचे पैसे मागत नाही. शेतकरी वीज मोफत मागत नाही. त्यांना त्या अखंड विजपुरवठा हवा आहे. आता जे पैसे दिले जात आहेत. तो लोकांचा कर आहे. राज्यात असंख्य नोकऱ्या आहेत. परंतु त्याची माहिती राज्यातील युवकांपर्यंत जात नाही. बाहेरच्या राज्यातील युवकांना कळते की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने दिले जात आहे. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल ठाकरे यांनी केला.

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होण्यापूर्वीच पावसाची जोरदार हजेरी

दरम्यान सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भात असून उद्या हा दौरा पूर्ण होणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा…Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे दिले तरी मतदान होईल असे नाही

लोक खूप हुशार आहेत. त्यांना पैसे मिळत असतील तर नक्की घेतील. पण मतदान करणार नाही. कोणी तरी मला सांगितले, की मतदानाच्या दिवशी कोल्हापुरात दरवाजावर पिशवी लावलेली असते. जेवढे मतदार तेवढे पैसे त्या पिशवीमध्ये ठेवलेले असतात. अशा तीनचार पिशव्या असतात. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले कसे कळणार? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.