नागपूर : भूकंपाच्या धक्क्याने मंगळवारी दिली हादरली. बातमी वृत्त वाहिन्यांवर झळकताच दिल्लीत नोकरीनिमित्त गेलेल्या नागपूरकरांच्या आप्तस्वकीयांची चिंंता वाढली. ते सुखरूप असल्याची खात्री केल्यावरच त्यांचा जीव भांड्यात पडला.

नागपुरातील अनेक तरुण, तरुणी नोकरीनिमित्त दिल्लीत राहात आहेत. कोणी केंद्र सरकारच्या सेवेत आहेत तर कोणी राज्य सरकारच्या दिल्लीतील कार्यालयात कार्यरत आहेत. काहीजण बॅंकांमध्ये आहे. वेगवेगळ्या खासगी कंपन्यांनामध्ये अनेकजण काम करीत आहे. तेथे भूकंप झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकताच पालकांनी मुलांना फोन करून ते सुखरूप आहे किंवा नाही याची माहिती घेतली.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या निकालाची ४ लाख २० हजार उमेदवारांना प्रतीक्षा, दिरंगाईमागील कारण काय? जाणून घ्या…

नागपूरच्या हुडकेश्वर भागात राहणारी तरुणी सहा महिन्यांपूर्वी खासगी कंपनीत नोकरीला लागली. तिच्या पालकांनी कार्यालयात फोन करून स्थिती जाणून घेतली. अरूण हा नागपुरातील व्यवसायिक खरेदीसाठी दिल्लीत गेला होता. तेथे भूकंप झाल्याची माहिती त्याला नव्हती. त्याच्या पत्नीने फोन करून माहिती दिली. मात्र ज्या भागात तो होता तेथे जनजीवन सुरळीत सुरू होते.