लोकसत्ता टीम

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयांनी शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ९० टक्केच महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. या कार्यालयांना १० टक्के महसूल कमी मिळाला असला तरी हा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६.७९ कोटी रुपये अधिक आहे.

नागपूर आरटीओ कार्यालयाच्या अखत्यारित शहर, पूर्व नागपूर, वर्धा हे तीन आरटीओ कार्यालय येतात. शासनाच्या परिवहन खात्याने नागपूर शहर आरटीओला २०२३- १४ साठी १८३.५५ कोटी, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी २४०.२९ कोटी, वर्धा कार्यालयासाठी ६९.२५ कोटी रुपयांच्या महसूलाचे लक्ष दिले होते. परंतु, प्रत्यक्षात नागपूर शहर कार्यालयाने १६९.७४ कोटी, पूर्व नागपूर आरटीओ कार्यालय २१४.५० कोटी, वर्धा आरटीओने ५७.३५ कोटी रुपये महसूल मिळवला. हा महसूल २०२२- २३ या वर्षातील नागपूर शहर आरटीओच्या १५३.९९ कोटी, पूर्व नागपूर १९७.२५ कोटी, वर्धा आरटीओच्या ५३.५६ कोटी रुपयांच्या महसूलाहून जास्त आहे. करोनानंतर सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाल्यानंतरही या कार्यालयांनी चांगले काम केल्याचे या आकडेवारीवरून दिसत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-‘अखेरपर्यंत खिंड लढू’, भावना गवळी समर्थकांची निदर्शने

कार्यालयनिहाय महसूल (कोटींमध्ये)

१ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यानचा कालावधी

कार्यालयाचे नाव२०२२- २३२०२३- २४
शहर १५३.९९ १६९.७४
पूर्व नागपूर१९७.२५२१४.५०
वर्धा ५३.५६५७.५६
एकूण ४०४.८०४४१.५९

परिवहन आयुक्त, परिवहन सचिवांसह शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व त्याची योग्य अंमलबजावणीतून नागपुरातील तिन्ही कार्यालयांचा महसूल वाढण्यास मदत झाली. या महसूलात पुढच्या वर्षी चांगली वाढ होण्याची आशा आहे. -रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर.