प्राधिकरण सदस्यांसह प्राचार्य फोरमची मागणी मान्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरू असलेल्या पदव्युत्तर प्रथम वर्षांच्या परीक्षांना सर्वच स्तरातून  विरोध झाल्याने अखेर कु लगुरूंनी सर्व परीक्षा एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्राचार्य फोरम, व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर यांच्यासह प्राधिकरण सदस्यांनीही तूर्तास परीक्षा रद्द करण्याची मागणी के ली होती. परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ मिळणार आहे.

राज्यात करोनाने थमान घातल्याने सर्व विद्यापीठांनी आपल्या परीक्षा तूर्तास स्थगित केल्या आहेत. मात्र, नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर प्रथम वर्षांच्या परीक्षा ५ ते २० मेदरम्यान महाविद्यालय स्तरावर देण्याचा फर्मान काढले. बुधवारी रायसोनी अभियांत्रिकीच्या एम.टेक.च्या एका विद्यार्थिनीवर चक्क अतिदक्षता विभागातून परीक्षा देण्याची वेळ आली.  त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जीवाची परीक्षा घेतोय का, असा सवाल प्राचार्य फोरमने उपस्थित केला होता. मात्र, त्यानंतरही विद्यापीठाने परीक्षा मागे घेतली नाही. त्यामुळे  प्राधिकरण सदस्यांनीही विद्यापीठाला धारेवर धरले. डॉ. आर.जी. भोयर यांनी आज गुरुवारी कु लगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क साधून परीक्षा रद्द करण्याची मागणी के ली. वर्धा जिल्ह्य़ामध्ये आज कडक टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अशा भागांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे किं वा परीक्षा कशी द्यावी, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शिवाय ऑनलाईन परीक्षा घेतानाही अनेक अडचणी येत असल्याने अखेर विद्यापीठाने सर्व परीक्षा महिन्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या

‘द प्लॅटफॉर्म’चे राजीव खोब्रागडे आणि मानव अधिकार संरक्षण मंचाचे आशीष फुलझेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन पाठवत परीक्षा रद्द करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी के ली आहे. परीक्षा तात्काळ रद्द करून विद्यार्थ्यांना समोरच्या वर्गात प्रवेश न दिल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

करोना काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने त्या रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. कडक टाळेबंदीसह महाविद्यालयामधील कर्मचारीही करोना संक्र मित आहेत. त्यामुळे तूर्तास परीक्षा रद्द करण्याची मागणी कु लगुरूंनी मान्य केली.

डॉ. आर.जी. भोयर, सदस्य, व्यवस्थापन परिषद.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university exams postponed for a month zws
First published on: 07-05-2021 at 01:28 IST