नागपूर : चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशिष उबाळे यांनी कर्जाच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली हाेती. या प्रकरणी धंताेली पाेलिसांनी काही लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्मात्य आत्महत्येसाठी व्हॉट्सॲप ग्रुप कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींची चौकशी केली असून काही लोकांना याबाबत नोटीस पाठविण्यात आले आहे.

आत्महत्येचे कारण का?

चित्रपट निर्माते आशिष अरुण उबाळे यांनी चित्रपट तयार करण्यासाठी काही लोकांकडून लाखाेंचे कर्ज घेतले हाेते. मात्र, कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाला. सध्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरु असल्यामुळे कर्ज देणे शक्य नव्हते. कर्जबाजारीपणामुळे व सततच्या धमक्या व मानसिक छळामुळे त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणात आराेपी गिल यांच्यासह इतर १४ सदस्यांचा ‘६४ पेमेंट डिस्प्यूट‘ नावाचा ‘व्हाॅट्सअॅप ग्रुप’ तयार करण्यात आला हाेता. या ग्रुपवरून उबाळे यांना पैसे देण्याचा दबाव आणला जात हाेता.

१७ मे २०२५ राेजी उबाळे यांनी आत्महत्येपूर्वी व्हाॅट्सअॅपवरून मानसिक त्रास झाल्याचा संदेश पाठविला हाेता. पोलिसांना याप्रकरणात रामकृष्ण मठ गेस्ट हाऊसच्या खाेली क्रमांक एकमध्ये मृतदेह सापडला. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा व ाॅरेन्सिक तपास करून मृतकाचा माेबाईल व अन्य पुरावे जप्त केले आहेत. तपासादरम्यान याप्रकरणात एक फायनान्सर म्हणून हॅरी गिल याचे नाव समाेर आले. त्याला धंताेली पाेलिसांनी नाेटिस देऊन चाैकशीसाठी बाेलावले हाेते. मात्र, गिल याने पोलिसांच्या या नोटीसनंतर जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. सरकारी वकिलांनी आराेपीच्या अटकेची मागणी केली.

न्यायालय काय म्हणाले?

या प्रकरणात कर्ज देणारा पंजाबमधील हॅरी प्रकाशसिंह गिल याला धंताेली पाेलिसांनी नाेटिस दिली हाेती. यानंतर हॅरी गिल याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. ’६४ पेमेंट डिस्प्यूट’ या व्हाॅट्सअप ग्रूपचा हॅरी गिल हा फक्त सदस्य हाेता. त्याने पैशासाठी काेणतीही धमकी दिली नाही. फक्त ग्रूपचा सदस्य असणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असे हाेऊ शकत नाही, त्यामुळे हॅरीला अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद आराेपीच्या वकीलांनी न्यायालयात केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्हाॅट्सअॅप ग्रुप’मधील संभाषणांचा तपास झाला असून, आराेपीच्या काेठडीची गरज नसल्याचा गिलचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि त्याचा ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र साहू, गुरुप्रीतसिंह चंडाेक, गाैरव साहू, स्नेहल राऊत, भूषण माेजनकर यांनी बाजू मांडली.