नागपूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेला जाहिरनामा म्हणजे केवळ जुमला आहे. अदानी कुठे या जाहीरनाम्यात दिसले नाही. जनतेचे लुटले पैसे जाहीरनाम्यात दिसले नाही. हा फेकू जाहीरनामा असून जनता या याला मान्यता देणार नसल्याने निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. गरीब, शेतकरी, व्यापारी लक्षात घेता हा जाहिरनामा तयार करण्यात आला असला तरी ती सगळी खोटी आश्वासने आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी जाहीरनाम्यात देण्यात आलेली आश्वासने अजुनही पूर्ण झाली नाही त्यामुळे हा जाहिरनामा जुमला असल्याची टीका पटोले यांनी केली. अभिनेते सलमान खान यांच्या घरावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला आहे त्यामुळे राज्यात गुंडाची दहशत वाढली आहे. कायदा सुवस्था बिघडली असताना गृहमंत्री मात्र निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार निश्चित असल्यामुळे विशाल पाटील यांनी काय निर्णय घेतला याबाबत माहिती नाही. त्यांच्याशी या विषयावर चर्चा नाही.

हेही वाचा…चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षा गायकवाड यांची ज्या जागा आम्हाला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही ही त्यांची भूमिका आहे. आघाडीत जागा मिळाल्या नाही त्यामुळे त्यांनी हायकमांडने आपले मत मांडले आहे. ज्या जागा काँग्रेसला हव्या होत्या आणि त्या शिवसेना आणि शरद पवार गटाकडे गेल्या आहेत, त्यात काही बदल करण्यासाठी वर्षा गायकवाड प्रयत्न करत आहे मात्र त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही पटोले म्हणाले.