गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये महाभारत सुरू झाले आहे, त्यामुळे राज्यातील या असंवैधानिक सरकारबाबत आम्ही फार काही वक्तव्य करावे, असे नाही. लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला आहे. या सरकारने ज्या प्रकारे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरुण, बेरोजगारांचा ज्या प्रकारे छळ केला, गरिबांच्या हातातील काम हिसकावून घेतले, ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची वाताहात सुरू आहे, त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि या भ्रष्टाचारी, जनविरोधी, असंवैधानिक महायुती सरकारला राज्यातून हाकलून लावणे, हेच आमचे ध्येय आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ते शुक्रवारी मध्यरात्री गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी आमदार रमेश कुथे यांच्या भेटीला आले होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, महायुतीतील आपसातील भांडणाशी या राज्यातील जनतेला घेणे देणे नाही आणि आम्हालाही काही घेणं देणं नाही सरकारनी सरकार प्रमाणे काम करावे आज राज्यात भ्रष्टाचाराचे राज्य करण्याच्या काम या सरकारने केला आहे त्याला कसं थांबवावे यावर आमचं काम सुरू आहे. सुनील तटकरे म्हणाले की मला काँग्रेसची मतं मिळाली आहे यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की आम्हा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना पण भाजपची मतं मिळाली आहे म्हणून तर आमची कामगिरी आणि आकडेवारी लक्षणीय ठरली आहे.  राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकार ही महाराष्ट्र विरोधी आहे आणि म्हणून या महाराष्ट्र विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे आणि पुढे त्याकरिता धोरण आखून त्याची लोकसभेप्रमाणेच विधानसभेत ही अंमलबजावणी करणे हे आमचे प्राथमिक लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे आणि आंदोलन उभारण्याच्या इशारा दिला आहे यावर पटोले म्हणाले की अण्णाजी आमच्या सरकार असताना जसे आंदोलन केले तसे आज करीत नाही आहेत ते त्यांनी करावे अशी अपेक्षा…

हेही वाचा >>>विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ आणि ओबीसी बद्दल एका प्रश्नाच्या उत्तरात नाना म्हणाले की ओबीसी बद्दलच्या राग भाजपच्या नेहमी राहिलेला आहे भाजपने अनेक ओबीसी च्या नेत्यांना संपविण्याच्या काम केलं आहे आणि आता योगायोगाने महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्षे तुरुंगात टाकलं होतं त्यांना पुन्हा सोबत घेतलं मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांच्या छळ आजतागायत संपलं नाही असे चित्र आज आपण पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनेक नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. पण त्यांना घेताना काही निकष ठरविलेले असल्याचे असे सूचक वक्तव्य ही नाना पटोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित खासदार डा. प्रशांत पडोळे उपस्थित होते.