नागपूर : वर्ष २०२० मध्ये केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मंजूरी दिली होती. या धोरणानुसार, शालेय शिक्षणाचा आराखडा तयार करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने जुलै २०२३ मध्ये शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे सादर केला आणि यानंतर २३ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण विभागाने हा अंतिम आराखडा राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे (एनसीईआरटी) सुपुर्द केला आहे.

आराखड्यात म्हटले आहे की, बोर्डाच्या परीक्षा वर्षातून किमान दोन वेळा होतील. विद्यार्थ्यांना गुण मिळवण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून किमान दोन वेळा होतील. शालेय शिक्षण आराखड्यानुसार, नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना भारतीय भाषा विषयांची सक्ती करण्यात आली आहे. इयत्ता नववी आणि दहावीसाठी विद्यार्थ्यांना एकूण तीन भाषा असतील. यापैकी दोन भारतीय भाषा शिकणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. सर्व माध्यमिक शाळांना तीन भाषा विषय आणि इतर सात विषय असतील. यापैकी कला, शारिरीक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण याचे मुल्यमापन शाळेच्या स्तरावर होईल.

हेही वाचा : ‘त्या’ बेपत्ता चिमुकल्याचा अखेर मृतदेहच मिळाला

सर्वोत्तम गुण ग्राह्य धरणार

‘बोर्ड परीक्षांचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना वर्षभरात दोन परीक्षा देता येईल आणि यापैकी ज्या परीक्षेत सर्वोत्तम गुण आहेत त्या परीक्षेचे निकालपत्र विद्यार्थी ग्राह्य धरू शकतील, असेही आराखड्यात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : धक्कादायक! हुडकेश्वरच्या हवालदाराकडे चक्क आरोपीची कार, जप्तीच्या मुद्देमालाचा पोलिसांकडूनच वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इयत्तेनुसार भाषा विषयाची सक्ती

इयत्ता दहावीसाठी विद्यार्थ्यांना एकूण दहा विषय असतील. यापैकी तीन भाषा विषय असतील. तीन भाषा विषयांपैकी दोन भारतीय भाषांचे विषय बंधनकारक असतील. तर अकरावी आणि बारावी या दोन वर्षांसाठी विद्यार्थ्यांना दोन भाषा विषय असतील. यापैकी एक भारतीय भाषा असणे गरजेचे आहे. बारावी बोर्ड परीक्षेसाठी शाळेने विद्यार्थ्यांवर निवडलेल्या शाखेनुसार (उदा. विज्ञान किंवा वाणिज्य) विषय निवडण्याची सक्ती करू नये ,असेही आराखड्यात म्हटले आहे.