वाशीम : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज वाशीम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातून रिसोड तालुक्यातील व्याडमार्गे जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, आमदार अमित झनक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांची उपस्थिती होती.

हेही वाचा : शिक्षणाचा बाजार! वाशीम जिल्ह्यात अनधिकृत शाळा, विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले; शिक्षण विभागाने…

ही यात्रा घोटा, चिखली, वने गाढवी मार्गे दुपारी आसेगाव येथे विसावा घेणार आहे. तर रात्री रिठद येथे मुक्काम होईल. त्यानंतर उद्या ३० नोव्हेंबर रोजी वाशीमकडे प्रस्थान करेल.

Story img Loader