नागपूर: जात- पात- धर्म- लिंग कोणतेही असले तरीही प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटले आहे. तृतीयपंथी समाजानेही संविधानातील अधिकारांचा लाभ घेत स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात शनिवारी आयोजित अखिल भारतीय किन्नर संमेलनाला गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या प्रतिभेच्या जोरावर समाजात मानाचे स्थान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करावा. आर्थिक विकास होण्यासाठी आपल्यातील कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.

हेही वाचा… भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार, मुलगी गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौशल्य विकासासाठी भारत सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेऊन आपल्यातील कौशल्य व्यक्तित्वात आणले तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल.