नागपूर : भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणीसाठी फोन करणारा जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहिर हा बेळगाव कारागृहात बंदिस्त असलेल्या दाऊद गँगच्या दोन सदस्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने दाऊद गँग, अल-कायदा, पीएफआय आणि लष्कर- ए- तोएबा यांच्याकडून आसाममध्ये शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जयेशवर बेकायदेशिररित्या कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात जानेवारी महिन्यांत जयेश पुजारी याने फोन करून १०० कोटींची तर मार्च महिन्यात १० कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे जयेशला नागपूर पोलिसांनी अटक केली. जयेशचा थेट दाऊद इब्राहिम गँगशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कर्नाटकातील बेळगाव कारागृहात असताना तेथे दाऊन गँगचे सदस्य माडरुल युसूफ आणि राशिद मलबारी यांच्या संपर्कात आला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा सचिव अफसर पाशा हा सुद्धा बेळगाव जेलमध्येच शिक्षा भोगत होता. धर्मांतरीत मुस्लिम असलेल्या जयेश ऊर्फ सलीम शाहीर याला त्यांनी जाळ्यात ओढले. प्रतिबंधित असलेल्या संघटनांच्या अन्य सदस्यांच्या मार्फत जयेश हा आसामला गेला होता. तेथे त्याने शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तपासात हे सर्व उघडकीस आल्यामुळेच जयेशवर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा >>>अकोला: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीड वर्षांपासून गडकरींची टेहळणी

बेळगाव कारागृहात जयेशला पैसे देऊन स्मार्टफोन वापरायला मिळत होता. दाऊद टोळी आणि लष्कर-ए-तोएबाच्या सांगण्यावरूनच गेल्या दीड वर्षांपासून जयेश हा नितीन गडकरी यांची टेहळणी करीत होता. तो नागपूर आणि दिल्ली कार्यालयात फोन लावून गडकरींबाबत माहिती गोळा करीत होता. दहशतवाद्यांच्या सांगण्यावरूनच जयेशने १०० कोटींची खंडणी मागितली होती. दहशतवाद्यांना केवळ ताकद दाखविण्यासाठीच गडकरींना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.