देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. याच निमित्त नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नितीन गडकरींनी यंदा काय संकल्प करणार आहे यासंदर्भात भाष्य करताना यंदाच्या वर्षी काय संकल्प करणार आहे याबद्दलची माहिती दिलीय. यावेळेस नितीन गडकरींनी त्यांच्या कार्यालयामध्ये लावलेल्या एका संस्कृत गाण्याच्या ओळींचा संदर्भ देत आपण त्याच दृष्टीने राजकारण करतो असं म्हटलंय.

नक्की वाचा >> “ते स्वभावाने फटकळ आहेत पण…”; गडकरींच्या वाढदिवसाच्या दिवशीच संजय राऊतांचं वक्तव्य

वाढदिवसाच्या निमित्तानं काय संकल्प केलाय असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मी माझ्या ऑफिसमध्ये एक संस्कृतमधलं पद्मश्री डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या गाण्यातलं एक वाक्य लिहिलं आहे. मनसा सततं स्मरणीयम्. मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयम्… असं ते वाक्य आहे,” असं गडकरी म्हणले.

तसेच पुढे बोलताना, “मी मानतो की राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं साधन आहे. जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, सामाजिक आर्थिक आणि शैक्षिणक विकासापासून जे दूर आहेत (त्यांच्यासाठी काम करायचं) हा जो पंडित दिनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार आहे त्यासाठीच मी स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे. ते प्रयत्न मी सतत करत राहील,” असं गडकरी म्हणाले.

नक्की वाचा >> Birthday Special: नितीन गडकरींना YouTube कडून महिन्याला किती पैसे मिळतात?; स्वत:च म्हणाले होते, “आज मला महिन्याला…”

पुढे बोलताना, “उद्या मी अकोल्याला जात आहे. तिथे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत. त्यापैकी २० सरोवरांचं उद्या उद्घाटन आहे. मी या वर्षी संकल्प करतो की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्फत वर्षभरात ७५ हजार अमृत सरोवरं तयार करणार आणि पंतप्रधानांच्या या मोहिमेमध्ये मदत करणार त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करु,” असंही गडकरींनी सांगितलं.

नक्की वाचा >> २५ कोटी, कढी भात अन् अजित पवार… राष्ट्रवादीच्या नेत्यानेच जाहीर सभेत सांगितला ‘तो’ किस्सा; गडकरींनी हसून दिली दाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज नितीन गडकरींना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे. अनेकजण रांगेत उभं राहून गडकरींना भेटायला येत आहे. गडकरींच्या घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने एक मंडप उभारण्यात आलाय.