लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकवणाऱ्या आरोपी जयेशचे दहशतवाद्यांशी संबंध बघता शहर पोलिसांनी आरोपीवर बेकायदेशिररित्या कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना अहवाल पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.

आयबी, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेसह या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुमारे ७० पानांचा अहवाल पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबत रोज या प्रकरणातील धक्कादायक माहिती पोलिसांना कळत आहे. ही नवीन माहितीही केंद्रीय तपास यंत्रणांना दिली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा कधीही चौकशीसाठी नागपुरात येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे जयेशचा नागपुरातील मुक्कामही वाढला आहे.