नागपूर : नितीन गडकरी आपल्या नवनवीन कल्पना व योजना राबवण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. आता नितीन गडकरी नागपुरातील नागरिकांच्या जुन्या चपला-जोडे गोळा करणार आहेत. या चपला-जोड्यांचे ते काय करणार आहे, हे आपण बघूया.

नागपुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, महिलांचे साड्यांवर विशेष प्रेम असते. एकदा साड्या घेतल्यावर बऱ्याच महिला त्या एक-दोन वेळा घातल्यावर पुन्हा घालत नाही. मी एकदा माझ्या पत्नीलाच विचारले, या एक-दोनदा साड्या घातल्यावर तुम्ही घालत का नाही. तुम्हाला गरज नसल्यास या साड्या मला द्या. त्यानंतर आम्ही महिलांच्या नागपुरात जुन्या साड्या गोळा करणे सुरू केले. या साड्या एका संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीसह मागास भागातील गरजू आदिवासी व मागास महिलांना उपलब्ध केल्या जातात. त्यामुळे आता कुणा गरीब आदिवासींकडे लग्न असल्यास त्या आमच्याकडे या साड्या मागायला येतात. आम्ही त्या धुने- पाॅलीश करण्यासह त्याला चांगल्या डब्यात बांधनीकरून उपलब्ध करतो.

हेही वाचा – ‘एसटी’ची ३९ लाख ‘स्मार्ट कार्ड’ निष्क्रिय!; कंत्राट नूतनीकरण न झाल्याचा फटका

हेही वाचा – प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात; भारतात चित्त्यांच्या आगमनाची आज वर्षपूर्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नागपुरातील नागरिकांचे जुने जोडे-चपलाही आम्ही गोळा करणार आहोत. त्याला मग धुने, पाॅलिश करणे, दुरुस्त करून चांगल्या डब्यात बांधनी करून गरजूंना उपलब्ध केल्या जाईल. त्याने असह्य नागरिकांना मदत होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.