लोकसत्ता टीम
वर्धा: राज्यातील ३४ जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे कडून जून महिन्याच्या शेवटी लेखी परीक्षा होणार आहे. तब्बल २ हजार ३८४ केंद्रप्रमुखांची पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहे. त्यासाठी १५ जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.




जिल्हा परिषदेत शिक्षक असणाराच या साठी पात्र आहे. मात्र, त्याने पदवी घेतली असावी. सर्वाधिक जागा पुणे १५३, रत्नागिरी १२५, अहमदनगर १२३, नाशिक १२२ अशा आहेत. लेखी परीक्षा दोनशे गुणांची असून वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असून दोन तासाचा कालावधी मिळणार.सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड होणार आहे.