नागपूर : शहरात मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली आले आहे. मध्यरात्री दोन ते पहाटे पाचपर्यंत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. संपूर्ण राज्यातच येत्या ४८ तासांत मान्सून सक्रीय राहणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला. तर अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबरपर्यंत मोसमी पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी

हेही वाचा – नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते चक्रीय स्थितीत आहे. ते पश्चिम झारखंड आणि लगतच्या भागात आहे. तसेच कमी दाबाची रेषा ही सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्रपर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत मान्सून अतिसक्रिय राहणार आहे.