scorecardresearch

उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यानंतर आता विदर्भातील ‘या’ जिल्ह्याच्या नामांतराची होत आहे मागणी

जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा अपभ्रंश झाला.

उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यानंतर आता विदर्भातील ‘या’ जिल्ह्याच्या नामांतराची होत आहे मागणी

वाशीम : राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचे धाराशिव, संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर आता वाशीम शहराचे नाव बदलून वत्सगुल्म करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून सोशल मीडियावर देखील प्रचार, प्रसार होत आहे.

हेही वाचा >>>यवतमाळमध्ये जमिनीत झाला स्फोट! भूमिगत पाईपलाईन फुटली अन्…; थरकाप उडवणारा Video एकदा पाहाच

जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा अपभ्रंश झाला. त्यापासून वच्छोम, वाच्छिम आणि वाशीम असा शब्द तयार झाला. वाशीमचे नाव वत्सगुल्म करावे, ही मागणी जुनीच आहे.१९९९- २००० च्या दरम्यान या मागणीने जोर धरला होता. अनेक वर्ष शहरात वत्सगुल्म (वाशीम) असे दुहेरी नाव वापरा असे फलक झळकत होते. विद्यमान सरकारने नुकतेच संभाजीनगर आणि धाराशिव ही नामांतरे केल्यामुळे वाशीमकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा >>>गोंदिया : आरोग्यवर्धिनी केंद्राच्या लोकार्पणाचा मुहुर्त कधी? दोन वर्षांपासून इमारत तयार, कामकाज अद्याप नाहीच

विद्यमान शासनाची अनुकूलता लक्षात घेवून वत्सगुल्म नामांतर जनजागरण मंच वत्सगुल्मच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रा. दिलीप जोशी, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, व्यापारी मंडळाचे जुगलकिशोर कोठारी, शिवसेना शहर प्रमुख श्याम दुरतकर, वसंतराव धाडवे, मधुसुदन काकानी, बंटी शेठी, यश काष्टे, राजू कलवार, रामभाऊ ठेंगडे फौजी, मनोज जैस्वाल, छायाताई पवार, वृषाली टेकाळे, प्रांजल काकानी, शिवाणी गोगे, अजय ढवळे, पंकज गाडेकर, सुनील देशमुख, आतिषसिंह कश्यप, जयपाल साबळे व आदी उपस्थित होते. तसेच विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते सरसावले असून सोशल मीडियातून देखील मागणीने जोर धरला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 15:44 IST