लोकसत्ता टीम

वाशीम: शहरातील हिंगोली नाका परिसरातील एका युवकाकडून पोलिसांनी धारधार शस्त्रासह गावठी बंदूक जप्त केली. शहरात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा बंदूक आढळून आल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील हिंगोली नाका येथे एका युवकाकडे गावठी बंदूक असल्याची गुप्त माहिती मिळताच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता राधेश्याम देशकर यांच्याकडे एक गावठी बंदूक व धारधार शस्त्र आढळून आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वाशीम शहरात दोन वेग वेगळ्या घटनात दोन बंदुका आढळून आल्या होत्या. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा बंदूक आढळून आल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.