नागपूर: नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यासाठी कामी लागली आहे. मात्र, हवामान खात्याने १० ते १२ डिसेंबरदरम्यान नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या दौऱ्यावर पावसाचे सावट असणार आहे.

बंगालच्या उपसागरात बुधवारी रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या वातावरणात देखील बदल झाला आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नागपुरात होणार आहे. समृद्धी महामार्गासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. मिहानमधील एम्सच्या परिसरात त्यांची सभाही होणार आहे. त्यासाठी या परिसरात मोठा मंडप टाकण्यात येत आहे.

हेही वाचा: नागपूर: समृद्धीची पाहणी, मेट्रोची सफर, ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा आणि अन्य काही…. कुठे कुठे जाणार पंतप्रधान?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधानांनांच्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना प्रादेशिक हवामान केंद्राने पुढच्या काही दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. केंद्राचे उपमहासंचालक एम.एल. साहू यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, सध्या किमान तापमानात वाढ होत आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे १० डिसेंबरला तर नाही, पण ११ आणि १२ डिसेंबरला पावसाच्या सरी कोसळू शकतात.