नागपूर : ‘मी इथला डॉन आहे. पाच हजार रुपयांची खंडणी पाहिजे,’ अशा शब्दात युवकाला धमकावून त्याच्याकडून पाचशे रुपयांची खंडणी घेतली. पीडित युवकाला मारहाण करून त्याच्या वडिलांना धक्काबुक्की केली. हा प्रकार अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत कुंजीलालपेठ येथे घडला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. गौरव रगडे (२६) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.

कुंजीलाल पेठ परिसरात गौरव आणि त्याचा साथीदार अर्जुन उर्फ चिनी हे दोघेही दादागिरी करतात. कोतवाली ठाण्याअंतर्गत घडलेल्या खून प्रकरणात गौरव हा रेकार्डवर आहे तर अजनी ठाण्यात किरकोळ गुन्ह्याची नोंद आहे. त्याचा एक साथीदार अर्जुन उर्फ चिनी याच्यावरसुद्धा किरकोळ गुन्ह्याची नोंद आहे. कुंजीलाल पेठ येथील रहिवासी फिर्यादी संकेत शंभरकर (१९) हा नुकताच या परिसरात किरायाने राहायला गेला. तो एका कॅफेत काम करतो.

हेही वाचा – मंत्रालयातील अधिकाऱ्यांमुळे ग्राहक आयोगातील नियुक्त्या रखडल्या! प्रकरण काय?

आरोपी गौरव आणि त्याचा साथीदार अर्जुन हे मिळून वस्तीत दादागिरी करतात. मंगळवारच्या सायंकाळी संकेत घरी होता. दरम्यान आरोपी गौरव आणि अर्जुन दोघेही भिंतीवर चढून त्याच्या खोलीसमोर उभे झाले. दाराला लाथा मारल्या तसेच संकेतला बाहेर येण्यासाठी जोरजोराने ओरडले. संकेत दार उघडून बाहेर आला असता आरोपींनी संगणमत करून त्याच्या घरात प्रवेश केला. संकेतच्या वडिलांना धक्काबुक्की केली आणि संकेतला मारहाण केली.

हेही वाचा – चंद्रपूर : डॉ. अशोक जीवतोडे भाजपमध्ये प्रवेश करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तू इथे कसा काय राहायला आलास, मी इथला डॉन आहे. येथे राहायचे असेल तर पाच हजार रुपये महिना द्यावा लागेल.’ तर त्याचा साथीदार अर्जुनने चाकू काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या संकेतने पाचशे रुपये दिले. आरोपी निघून गेल्यानंतर संकेतने पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदवून गौरवला अटक केली. त्याचा साथीदार अर्जुनचा शोध सुरू आहे.