प्रजास्ताक दिनानिमित्त गुप्तचर विभागाने राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामुळे नागपूर पोलीस ‘अलर्ट मोड’वर आहेत. नागपुरात ३ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

हेही वाचा – Republic Day 2023 Live: दिल्लीतील ‘कर्तव्य पथा’वर पथसंचलनाला सुरुवात; मान्यवरांसह सामान्य नागरिकांचीही मोठी गर्दी!

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात घातपात होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झाले असून कालपासूनच नागपूर पोलिसांनी उपराजधानीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलीस आयुक्‍तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना फिक्‍स पॉइंट नेमून देण्यात आले आहेत.

हेही वाचा – नागपूर : ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशी ख्याती असलेले परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रजासत्ताकदिनाचा आनंद साजरा करताना तरुणाईंनी कोणत्याही प्रकारचा उन्माद करू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. गर्दी आणि बाजाराच्या ठिकाणी महिला पोलिसांची विशेष नजर राहणार असून अनुचित प्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. संवेदनशील ठिकाणी सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहे. यासोबतच रेल्वेस्थानक, बसस्थानक, दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, मॉल, मल्टिफ्लेक्‍स सिनेमागृहे, टेकडी मंदिर यासह अन्य धार्मिक स्थळीही पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिशीघ्र कृती दलाच्या जवानांनाही (क्‍यूआरटी) २४ तास अलर्ट ठेवण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.