रुपयांची सातत्याने घरसण होत असल्याने युवक काँग्रेसने नागपूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात आंदोलन केले.

मोदी सरकराच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण होत आहे. एका डॉलरचे मूल्य ८० रुपये झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना २०१३ मध्ये एका डॉलरची किंमत ५९ रुपये होती. रुपया घसरत असल्याने देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि उद्योग-धंद्यावर परिणाम होत आहे.

मोदी सरकार रुपयाची घसरण थांबण्यात अपयशी ठरले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पोस्टर आंदोलन युवक काँग्रेसने केले. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम नागपूरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अगस्टीन जॉन यांनी ठिकठिकाणी पोस्टर लावून आंदोलन केले.