नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रविवारी रात्री अडीच तास वीज खंडित झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. त्यावर डागा रुग्णालयात महावितरणसोबत झालेल्या बैठकीतही वीज खंडित झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून डागा रुग्णालयात सातत्याने कमी- अधिक प्रमाणात वीज खंडित होत आहे.

रविवारी डागा रुग्णालयात सुमारे अडीच तास रात्री वीज खंडित झाल्याने जवळपास सर्वच वार्ड अंधारात होते. सोमवारी डागा प्रशासनाने महावितरण अधिकाऱ्यांना वीज खंडित प्रश्नावर बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, ही बैठक सुरू असतानाही सुमारे ५ मिनिटे वीज खंडित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डागा रुग्णालयात एकूण ३ जनरेटर (जनित्र) आहेत. त्यापैकी एक नादुरुस्त होता. डागा प्रशासनाने तातडीने सोमवारी हे जनरेटर दुरुस्त करत नवीन जनरेटर घेण्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : जंगल, वाघ वाचवण्यासाठी पर्यावरणवादी एकवटले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीजपुरवठा खंडित झाल्यावर एकाही रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली आहे. दोन जनरेटरच्या मदतीने लेबर रुम, शल्यक्रिया गृह, अतिदक्षता विभागात वीजपुरवठा सुरळीत होता. महावितरणला येथे पुन्हा वीज खंडित होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेण्याची सूचना केली आहे. – डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात, नागपूर.