नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या मेळाव्यात सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात हे महत्त्वाचे असते.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणा-या संघाच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते व स्वंयसेवक नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहतात.

हेही वाचा… बुलढाणा : गड किल्ले भाडेतत्त्वावर, ही तर इतिहासाशी बेईमानी! मनसेचा जन आंदोलनाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ पासून भाजप केंद्रात सत्तेवर आहे. गडकरी केंद्रात मंत्री आहेत. मात्र प्रत्येक दसरा मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित राहतात. अशाच प्रकारे २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस राज्यांचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी सुध्दा ते संघाच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहात होते आणि आणि आता उपमुख्यमंत्री असताना ते उपस्थित आहेत. हे दोन्ही नेते संघाच्या पारंपरिक पोशाखात हजेरी लावतात. मंगळवारच्या मेळाव्यातही ते शस्त्रपूजन व पथसंचलन कार्यक्रमाला उपस्थित होते.