नागपूर : कोकण विभागात मुसळधार पावसाने ठाण मांडले असतानाच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत असतानाच काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. तर, आजही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आल आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे माना कुरुमजवळ रेल्वे ट्रॅकवरून पाणी वाहत असल्याने रेल्वे वाहतूक थांबवली आहे. रुळाखालील भराव वाहून गेला आहे. माना-कुरूम गावादरम्यान रेल्वे रूळ वाहून गेल्याने मुंबई आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरे म्हणतात, ‘होऊन जाऊ दे चर्चा!’; पीएम केअर फंडाचा मागितला हिशोब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा भंडाऱ्यात दमदार पावसाने हजेरी लावली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.