नागपूर : एकूण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदीने मंगळवारी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घातला. नागपूर विद्यापीठ आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) यांचा समावेश असलेल्या आयोजकांनी दिलेल्या निकृष्ट सुविधांबाबत मान्यवर, विद्यार्थी आणि अगदी माध्यमातील व्यक्तींकडूनही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.

हेही वाचा >>> मोदींमुळेच विज्ञान प्रगतिपथावर! राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचाही सूर

Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षरित्या येऊ न शकल्याने आधीच कार्यक्रमाची शोभा गेली. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील समारोपीय सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक पाहुण्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारल्याने विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आणि वूमेन्स सायन्स काँग्रेसचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. विज्ञान काँग्रेसच्या नियोजनासंदर्भात संशोधकांच्याही अनेक तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे संकेतस्थळावरही अनेक तक्रारी आहेत. येथे कार्यक्रमासंदर्भात कुठलीही अद्ययावत माहिती नाही. प्रदर्शनाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याबद्दल अभ्यागतांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> उपराजधानी हत्याकांडाने हादरली, तलवारीने भोसकून भरचौकात युवकाचा खून

प्रदर्शनासाठी विद्यापीठाच्या विभागांनाच मागितले १३ हजार रुपये

विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विज्ञान काँग्रेसचे २० कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. असे असतानाही विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना येथे प्रदर्शन लावण्यासाठी जागा देण्यास कंत्राटदाराकडून नकार दिला जात आहे. शिवाय प्रति प्रदर्शनासाठी १३ हजार रुपये मागितले जात आहेत. अनेक महाविद्यालये येथे नवनवीन प्रदर्शन मांडण्यासाठी उत्सुक आहेत. असे असतानाही त्यांना कंत्राटदाराच्या धोरणामुळे उपस्थित राहता येत नसल्याची माहिती आहे.